ShripadConsultancy

‘पुणे बुक फेअर’ प्रदर्शन ४ डिसेंबरपासून भरणार !

नाशिक (प्रतिनिधी): पश्चिम भारतातील सर्वांत मोठे ग्रंथ व शिक्षण प्रदर्शन ‘पुणे बुक फेअर २०२४’ अर्थात ‘पुणे पुस्तक जत्रा’ हे दरवर्षी भरविले जाते. या मालिकेतील २२ वे प्रदर्शन ४ ते ८ डिसेंबर २०२४ दरम्यान गणेश कला क्रीडा मंच, स्वारगेट येथे भरविण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते बुधवार, ४ डिसेंबर रोजी सकाळी ११ वाजता पुणे बुक फेअरचे उद्घाटन मराठा चेंबर ऑफ कॉमर्स सभागृहात होईल. या प्रदर्शनात देशातील नामवंत पुस्तक विक्रेते, वितरक, प्रकाशन संस्था, आरोग्य व्यवस्थापन, व्यापार, कायदा, धर्म, राजकारण, गणतंत्र, लोकसाहित्य, कविता, अध्यापन, प्रशिक्षण अशा विविध विषयांवरील इंग्लिश, मराठी, हिंदी, उर्दू, संस्कृत, आणि परदेशी भाषांतील पुस्तके, वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व ग्रंथ एकाच छताखाली उपलब्ध होतील.

महोत्सवात गुरुवारी (दि. ५) सकाळी ११ वाजता लेखक व प्रसिद्ध चित्रकार रविमुकुल यांची मुलाखत विनोद कुलकर्णी व स्वप्निल पोरे घेतील. तर शुक्रवारी (दि. ६) सकाळी ११ वाजता लेखक आपल्या भेटीलामध्ये रामदास फुटाणे, बंडा जोशी यांचा समावेश असेल. शनिवारी (दि. ७) सकाळी ११ वाजता निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. प्रदर्शन सकाळी ११ ते रात्री ८ पर्यंत गणेश कला क्रीडा केंद्र येथे पाहता येईल.

Loading