पुणे (प्रतिनिधी): पादचाऱ्यांच्या हक्कासाठी महापालिकेतर्फे गेल्या ४ वर्षांपासून ११ डिसेंबर रोजी पादचारी दिन साजरा केला जातो. यंदाही लक्ष्मी रोडवर नगरकर तालीम चौक ते उंबऱ्या गणपती चौक ते गरुड गणपती चौक यादरम्यान सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत पादचारी दिन साजरा केला जाणार आहे.
यानिमित्ताने लक्ष्मी रस्त्यावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. या मार्गावर “व्हेईकल फ्री रोड” करण्यात येणार आहे. यावेळी लक्ष्मी रोडवरील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात येत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.
⚡ असे आहेत पर्यायी मार्ग:
👉 लक्ष्मी रोडने बेलबाग चौकाकडून टिळक चौकाकडे जाणारी वाहतूक सेवासदन चौकातून उजवीकडे वळून बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.
👉 कुमठेकर रोडवरून लक्ष्मी रोडवरती जाणारी सर्व वाहने सरळ चितळे कॉर्नर डावीकडे वळून बाजीराव रोडने इच्छितस्थळी जातील.
👉 लोखंडे तालीम चौकाकडून कुंठे चौकाकडे जाणारी सर्व वाहने लक्ष्मी रोडने न जाता सरळ केळकर रोडने टिळक चौक मार्गे इच्छितस्थळी जातील.