पुणे मेट्रोने एप्रिल २०२५ मध्ये ₹ ७.४७ कोटींचे उत्पन्न व ४६.५९ लाख प्रवाशांची नोंद केली

पुणे (प्रतिनिधी): एप्रिल २०२५ मध्ये पुणे मेट्रोने एकूण ₹७.४७ कोटी रुपयांचे मासिक उत्पन्न मिळवले असून, या कालावधीत ४६.५९ लाख प्रवाशांनी मेट्रो सेवेचा लाभ घेतला. वानाज–रामवाडी (अ‍ॅक्वा लाईन) मार्गाने ₹४.१० कोटींचे उत्पन्न मिळवून २६.१८ लाख प्रवाशांची वाहतूक केली, तर पीसीएमसी–स्वारगेट (पर्पल लाईन) मार्गाने ₹३.४१ कोटींचे उत्पन्न आणि २०.४० लाख प्रवाशांची नोंद झाली.

ही आकडेवारी जानेवारीनंतरची वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च मासिक कामगिरी आहे. जानेवारीमध्ये ₹७.८७ कोटी उत्पन्न व ४९.६४ लाख प्रवासी नोंदवले गेले होते. ही सातत्यपूर्ण वाढ पुणे मेट्रो ही पर्यावरणपूरक, वेळ-बचत करणारी व नागरिकांची पसंतीची वाहतूक सेवा बनली आहे, याचे स्पष्ट निदर्शक आहे.

दररोजच्या प्रवासी संख्येनुसार सर्वाधिक गर्दी असणाऱ्या स्थानकांमध्ये पीसीएमसी (१८,०००), स्वारगेट (१५,०००), तसेच रामवाडी, मंडई आणि पुणे रेल्वे स्थानक (प्रत्येकी १३,०००) यांचा समावेश आहे. पुणे मेट्रोचा वाढता विस्तार व विश्वासार्ह सेवा शहरातील वाहतुकीस नवी गती देत आहे.

Loading