पुणे। दि. ९ जून २०२५: रुबी हॉल क्लिनिकमध्ये कार्यरत असलेले डॉ. श्याम व्होरा (वय 28) यांनी त्यांच्या हॉस्टेलच्या खोलीत गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री उघडकीस आली. आत्महत्येपूर्वी त्यांनी एका कागदावर मोबाईलचा पासवर्ड लिहून ठेवला होता, त्यामुळे मृत्यूचे कारण मोबाईलमध्ये लपले असल्याचा संशय आहे. पोलीस तपास सुरू असून नेमके कारण शोधले जात आहे. मागील काही दिवसांत आत्महत्यांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. याआधी सोलापूरचे डॉ. शिरीष वळसंगकर यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.