पुणे: पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड

पुणे (प्रतिनिधी): बेकायदा देशी बनावटीची पिस्तुले बाळगणाऱ्या दोन गुंडांना गुन्हे शाखेने अटक केली. त्यांच्याकडून दोन पिस्तुले, तसेच दोन काडतुसे जप्त करण्यात आली. अनिकेत राजू साठे (२१) आणि आदित्य सतीश घमरे (२१,दोघे रा. येरवडा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. साठे आणि घमरे दोघेही सराईत आहेत. दोघांविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यांच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

Loading

Was this helpful?