ShripadConsultancy

पुणे: फ्रिज कॉम्प्रेसरचा स्फोट; एकाचा मृत्यू, दोन जखमी

पुणे (प्रतिनिधी): भंगार दुकान असलेल्या मोकळ्या जागेत फ्रीज कॉम्प्रेसर सिलिंडर टाकीचा स्फोट झाला. त्यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तीन कामगार जखमी झाले. ही घटना बी. टी. कवडे रस्ता परिसरात शुक्रवारी सायंकाळी सव्वापाच वाजेच्या सुमारास घडली.

महंमद शेख (वय ५०) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. किशोर साळवे (वय ४०), दिलीप मिसाळ (वय ४०) आणि महंमद सय्यद (अंदाजे वय ५०) अशी जखमींची नावे आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भंगार दुकानामध्ये मालाचा साठा असलेल्या मोकळ्या जागेत जुने फ्रीज, टीव्ही तसेच विद्युत उपकरणामधील भाग काढण्याचे काम करण्यात येते. यावेळी जुन्या फ्रीजमधील कॉम्प्रेसर काढून ते फोडण्याचे काम करत असताना सिलिंडरचा स्फोट झाला. हा स्फोट इतका मोठा होता की तेथील कामगार महमंद शेख यांचा जागीच मृत्यू झाला. स्फोटाचा आवाज अर्धा किमीपर्यंत ऐकू गेला व परिसरालाही हादरा बसला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते. अधिक तपास मुंढवा पोलिस करत आहेत. शहरात

स्फोटाच्या घटना वारंवार घडत आहे. यात अनेकांचा नाहक बळी गेला आहे. यापुढे तरी अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे.

Loading