ShripadConsultancy

पुणे: बेकायदा इंजेक्शनच्या १६० बाटल्या जप्त; तरुणीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे (प्रतिनिधी): ‘मेफेन्टरमाइन सल्फेट इंजेक्शन आयपी टर्मिव्हा’ या इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तरुणीला हडपसर पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी तिच्याकडील ५३ हजार रुपयांच्या ‘टर्मिव्हा’ इंजेक्शनच्या १६० बाटल्या जप्त करण्यात आल्या. हे इंजेक्शन कमी रक्तदाबाचा (लो ब्लड प्रेशर) त्रास असलेल्या रुग्णांसाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानेच वापरले जाते. आरोपी तरुणीला ३० डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

अंबिका ऊर्फ नेहा आनंदसिंह ठाकूर (वय २६, रा. माळवाडी, हडपसर) असे आरोपीचे नाव आहे. तिच्याविरुद्ध हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हडपसर पोलिसांचे पथक गुरुवारी गस्त घालत होते. त्यावेळी कामधेनू इस्टेट परिसरात एक तरुणी ‘टर्मिव्हा’ इंजेक्शनची विक्री करीत

मुलांच्या मदतीने औषध विक्री:
प्राथमिक चौकशीत आरोपी तरुणी माळवाडी परिसरात औषधाची विक्री करीत असल्याची माहिती मिळाली. त्याबाबतही पोलिस तपास करीत आहेत. या परिसरातील शाळा-कॉलेजमधील विद्यार्थ्यांना नशेखोरीसाठी आरोपीने हे औषध विकले आहे का, या अनुषंगानेही तपासणी केली जात आहे. आरोपी तरुणीला पोलिस कोठडी देण्याची सरकारी वकील डॉ. आम्रपाली कस्तुरे यांची विनंती न्यायालयाने मान्य केली.

असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने तिला ताब्यात घेतले. तिच्याकडील पार्सलमध्ये गुंगीच्या इंजेक्शनच्या पन्नास बाटल्या सापडल्या. त्यानंतर औषध निरीक्षक आणि पंचांच्या उपस्थितीत तिच्या घराची झडती घेतली असता या इंजेक्शनच्या आणखी ११० बाटल्या सापडल्या. अंबिका ठाकूर हिच्याकडे औषधविक्रीचा परवाना नाही. तसेच तिच्याकडे औषधनिर्मिती

अभ्यासक्रमाची (फार्मसी) पदवी नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या औषधाचा वापर केल्यास दुष्परिणाम होतात आणि सेवन करणाऱ्याच्या आरोग्याला इजा पोहोचू शकते. हडपसर विभागाच्या सहायक आयुक्त अश्विनी राख, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचारी सुशील लोणकर, संदीप राठोड, सचिन जाधव, नीलेश किरवे, गायत्री पवार आदींनी ही कारवाई केली.

Loading