ShripadConsultancy

पुणे: जंगली महाराज रस्त्यावरील कामाची होणार चौकशी !

पुणे (प्रतिनिधी): जंगली महाराज रस्त्यावर गेल्या ३० वर्षांत एकदाही खड्डा पडलेला नाही. पण, याच रस्त्यावर पाच वर्षांपूर्वी केलेले चेंबर खचून मोठा खड्डा पडला होता. एवढ्या कमी कालावधीत हा चेंबर खचला कसा, याची चौकशी पथ विभागाकडून केली जाणार आहे.

पुणे शहरात पावसाळ्यात अनेक रस्त्यांना खड्डे पडतात. पण, महापालिकेने सुमारे ३० वर्षांपूर्वी जंगली महाराज रस्त्याचे काम करताना त्याच्या कामाच्या गुणवत्तेकडे तत्कालीन अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्याने या रस्त्याला खड्डे पडत नाहीत. पण, गेल्या काही वर्षांपासून जंगली महाराज रस्त्यावर पावसाळ्यात पाणी तुंबण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे महापालिकेने येथील पावसाळी गटारांची क्षमता वाढविणे, नवीन चेंबर बांधण्याचे काम हाती घेतले होते.

जंगली महाराज रस्त्यावर हा चेंबर सुमारे ५ वर्षापूर्वी केलेला आहे. पण, तो एवढ्या लवकर कसा काय खचला, मोठी पोकळी कशी निर्माण झाली, याची चौकशी केली जाईल. संबंधित ठेकेदार आणि अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित केली जाईल. – अनिरूध्द पावसकर, पथ विभागप्रमुख, पुणे महापालिका

Loading